भाळवणी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  "माय मिनिस्टर खेळ पैठणीचा" कार्यक्रमांचे आयोजन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

भाळवणी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  "माय मिनिस्टर खेळ पैठणीचा" कार्यक्रमांचे आयोजन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

भाळवणी येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  "माय मिनिस्टर खेळ पैठणीचा" कार्यक्रमांचे आयोजन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

भाळवणी - भाळवणी (ता. पंढरपूर) येथे महिलांसाठी खास आयोजित केलेल्या "माय मिनिस्टर" खेळ रंगला पैठणीचा..! खेळाने कार्यक्रमाची रंगत वाढवली, ज्यात महिलांनी उत्साहीपणे सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतला.

सत्यशोधक युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या भव्य कार्यक्रम आयोजिन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डी. व्ही. पी. ग्रुपचे कार्यकारी संचालक अमर पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात 'माय मिनिस्टर' खेळाचा भाग म्हणून महिलांना विविध मनोरंजनात्मक व खेळात्मक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती, ज्यांनी आपल्या सृजनशीलतेचा आणि उत्साहाचा परिचय दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणात चांडाळ चौकटी करामती फेम रामभाऊ जगताप, निखिल साळुंखे, समीर अहीवळे आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणात आनंद व हशा यांचे वातावरण तयार झाले. यावेळी पहिल्या सहा विजेते महिलांना विविध वस्तुरुपात बक्षिसे देण्यात आली. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांमधून लकी डॉ. पद्धतीने चीठ्ठी काढून दहा महिलांना सादरकर्ते रामभाऊ जगताप यांच्या वतीने साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे महिलांना आणि समुदायाला एक सकारात्मक संदेश दिला गेला, ज्यामुळे समाजातील साक्षरता, समतेचे महत्त्व आणि क्रांतीच्या विचारांची महती वाढली.

यावेळी दीपक पवार, विलास देठे, पंचायत समिती सदस्या अक्काताई लोखंडे, हरिभाऊ लिंगे, नामदेव शिंदे, सरपंच रणजित जाधव, महेश इंगोले, पोपट इंगोले, लुकमन इनामदार, आनंद देशपांडे, प्रशांत माळवदे, भोजलिंग बाबर, संजय बाबर, धोंडीराम शिंदे, रवींद्र कारंडे, प्रवीण शिंदे, विलास माने, माऊली केसकर, महेश शिंदे, भैय्या डंबाळ, विशाल माळी, नितीन शिंदे, नामदेव चौगुले, मनोज कलढोणे, सौरभ तारळकर, डॉ. राजेंद्र लाले, डॉ. नंदकुमार जगताप, दिलीप भोसले, विजय लिंगे व सत्यशोधक युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच नितीन शिंदे यांनी केले.