फॅबटेक मध्ये "संशोधन प्रकाशन व नैतिकता" विषयावर कार्यशाळा

दर्जेदार संशोधनासाठी नैतिकतेचे महत्त्व; डॉ. विद्याराणी क्षीरसागर

फॅबटेक मध्ये "संशोधन प्रकाशन व नैतिकता" विषयावर कार्यशाळा

दर्जेदार संशोधनासाठी नैतिकतेचे महत्त्व; डॉ. विद्याराणी क्षीरसागर

फॅबटेक मध्ये "संशोधन प्रकाशन व नैतिकता" विषयावर कार्यशाळा

सांगोला - संशोधन हे केवळ नवीन ज्ञाननिर्मितीचे साधन नसून ते समाजाच्या प्रगतीसाठी जबाबदार आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. संशोधनातील प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि बौद्धिक संपदेचा आदर ही दर्जेदार संशोधनाची मूलभूत तत्त्वे आहेत. संशोधन लेखनातील साहित्यचौर्य, चुकीची माहिती सादर करणे, बनावट निष्कर्ष मांडणे यांसारख्या अनैतिक बाबींमुळे संशोधनाची विश्वासार्हता धोक्यात येते, असे सांगितले. संशोधकांनी आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करून संशोधन करणे, योग्य संदर्भ देणे आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून ज्ञाननिर्मिती करणे गरजेचे असुन दर्जेदार संशोधनामध्ये नैतिकतेचे महत्त्व आवश्यक असल्याचे मत डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील संशोधन व विकास कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने “रिसर्च पब्लिकेशन अँड एथिक्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. १ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेस पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक तसेच प्राध्यापक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी संशोधन लेखनाची रचना, संदर्भ शैली तसेच रेफरन्स मॅनेजमेंट टूल्सचा प्रभावी वापर याबाबत माहिती दिली. तर डॉ. आशिष जोशी यांनी आय ईईई,  स्प्निनंगर, सायन्स डायरेक्टर यांसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन डेटाबेसचा वापर, योग्य जर्नलची निवड, इम्पॅक्ट फॅक्टर तसेच स्कोपस इंडेक्सिंगची ओळख आणि निकष यावर सविस्तर विवेचन केले.

कार्यशाळे दरम्यान संशोधन प्रकाशनातील नैतिक मूल्ये, दर्जेदार संशोधन लेखनाची तत्त्वे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये संशोधन लेख प्रकाशित करण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांनी तज्ज्ञांशी संवाद साधत आपल्या शंकांचेनिरसन करून घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्या, संशोधन व विकास कक्ष, आयक्यूएसी, आयआयसी सदस्य तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यशाळेचे कौतुक करत भविष्यातही अशा ज्ञानवर्धक आणि संशोधनाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संशोधन व विकास कक्ष प्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, आय.क्यू.एसी समन्वयक प्रा. गणेश मिसाळ, आय.आय.सी समन्वयक प्रा. जगदीश हल्लूर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.