फॅबटेक पाॅलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची "पाटील ऑटोमेशन" कंपनीत निवड

कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा; प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती 

फॅबटेक पाॅलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची "पाटील ऑटोमेशन" कंपनीत निवड

फॅबटेक पाॅलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची "पाटील ऑटोमेशन" कंपनीत निवड

कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा; प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती 

सांगोला  - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणाऱ्या सांगोला फॅबटेक कॉलेज ऑफ पाॅलिटेक्निकने आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तब्बल २८ विद्यार्थ्यांची औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील नामांकित "पाटील ऑटोमेशन" कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रविण सपताळे, गणेश व्हनमाने, दर्याबा होनमाने, दीपक अनुसे, शुभम चव्हाण, विशाल हसबे, साद पठाण, यश कांबळे, सिहान शेख, ऋषिकेश लेंढवे, ऋषिकेश कांबळे, शुभम काळे, संतोष माळी, रोहन इंगळे, विनायक खटके, सुहास बनसोडे, अभिषेक काळे, आदित्य काळे, प्रसाद मोळक, अनिकेत सातपुते, राजरत्न नवगिरे, संकेत जोशी, आकाश सूर्यवंशी, हर्षद साखरे, राजू पटेल, सिद्धनाथ कोळी, अनिकेश भंडारे आणि शुभम मोटे यांचा समावेश आहे.

औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी पाटील ऑटोमेशन ही कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम, अचूक आणि सुरक्षित बनविण्याचे कार्य करते. कंपनीमध्ये पी एल जी, सी एन सी, रोबोटिक्स आणि Sensor-based Automation Systems चा प्रभावी वापर केला जातो. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कंपनीत फॅबटेकच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
फॅबटेक संस्थेने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार कौशल्य विकसित करण्यावर भर दिल्यामुळेच आज अनेक बहुराष्ट्रीय व नामांकित कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाकडे आकर्षित होत आहेत. या यशामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"शिक्षणातून रोजगार आणि रोजगारातून उज्ज्वल भविष्य" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत फॅबटेक पाॅलिटेक्निक विद्यार्थ्यांच्या यशाची नवी शिखरे सर करत असल्याचे या निवडीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.