खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान 

खा.शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथे सामाजिक उपक्रम

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान 

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान 

खा.शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त गादेगाव येथे सामाजिक उपक्रम

पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार  यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा आदर राखत "शरद प्रेरणा' म्हणून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील ८४ उत्कृष्ट विद्यार्थी यांचा शालेय साहित्य व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पवार साहेबांनी अनेक पदे भूषवली मात्र कधी गर्व बाळगला नाही. युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, महिलांना आरक्षण देण्याचे काम केले असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. 

यावेळी त्यांनी "शरद प्रेरणा" या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्दिष्ट पोहोचवण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य सूर्यकांत दाजी बागल, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर बागल, अरुण बागल, गोरख बागल, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सागर पडगळ, धनाजी बागल, संजय पवार, सुधाकर बागल, हनुमंत फाटे, रमेश फाटे, नवनाथ जगताप, विठ्ठल बागल, संजय बागल, शांतिनाथ बागल, प्रताप पवार, संतोष बागल, विठ्ठल बागल, हनुमंत बागल, औदुंबर माने, बाळू फाटे, ओंकार फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे, सचिन कदम, आकाश मांडवे, नवनाथ बागल, माणिक मस्के, रमेश कांबळे, राजू कांबळे, संतोष बागल, मुख्याध्यापक जगदाळे एस.एस, गायकवाड एस.एन, किरगत आर, एन यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड एस.एन यांनी केले तर आभार अशोक बागल यांनी मानले.