धुळदेव यात्रेनिमित्त राजाभाऊ खरे यांच्याकडून कुस्तीसाठी १लाख ५१ हजाराचे रोख बक्षीस

नजीक पिंपरी येथील श्री.धुळदेव यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचे मैदान संपन्न

धुळदेव यात्रेनिमित्त राजाभाऊ खरे यांच्याकडून कुस्तीसाठी १लाख ५१ हजाराचे रोख बक्षीस

श्री धूळदेव केसरी २०२४ च्या कुस्तीस राजाभाऊ खरे यांच्याकडून १लाख ५१ हजार रुपयाचे बक्षीस!

नजीक पिंपरी येथील श्री.धुळदेव यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचे मैदान संपन्न

पंढरपूर - श्री धूळदेव यात्रा कमिटी नजीकपिंपरी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत नजीकपिंपरी यांच्यावतीने श्री धूळदेव केसरी 2024च्या कुस्तीचे आयोजन केले गेले.

या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस क्रमांक 1साठी रुपये 1लाख एकावन्न हजार रुपयाचे रोख पारितोषिक उद्योजक व समाजसेवक तसेच मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्याकडून देण्यात आले.

सध्या मोहोळ तालुक्यात राजाभाऊ खरे यांना कर्तृत्ववान आणि दातृत्वाच्या नावानेही लोक आता ओळखू लागले आहेत कारण क्षेत्र कुठलेही असो त्या ठिकाणी पहिलं नाव समोर येत आहे ते म्हणजे राजाभाऊ खरे या कुस्तीच्या माध्यमातून राजाभाऊ खरे प्रथमतः पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

नजीकपिंपरी या गावात कुस्तीच्या आखाड्यात दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती वस्ताद मंडळी व पंचकमिटी यांनी राजाभाऊ खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कारही करण्यात आला.

यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजाभाऊ खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीचेही कुस्ती लावण्यात आली तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानांची कुस्ती खरे उपस्थितीत पार पडले.

यावेळी गावातील सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजाभाऊ खरे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.