फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील ३९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील ३९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील ३९ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

सांगोला - फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, सांगोला येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तब्बल ३९ विद्यार्थ्यांची पुणे येथील बजाज ऑटो लिमिटेड कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश कांबळे, अनिकेत सातपुते, गणेश होवाळ, दर्याबा होनमाने, गणेश काशिद, आदित्य काळे, समर्थ जाधव, सिद्धनाथ कोळी, साद पठाण, मुबारक पटेल, रोहन लवटे, दीपक अनुसे, गणेश यादव, सिहान शेख, प्रसाद मोलक, अभिजीत पाटील, आदित्य शिंदे, विशाल हसबे, सुहास बनसोडे, विनायक खटके, शुभम चव्हाण, गणेश व्हनमाने, अनिकेश भंडारे, ऋषिकेश लेंडवे, ऋषिकेश कांबळे, प्रशांत चौंडे, यशराजे जाधव, दीपक देसाई, हर्षल मिसाळ, सुमित भजनावळे, जयेश जाधव, राजरत्न नवगिरे, आकाश सूर्यवंशी, जीवक सूर्यवंशी, अभिषेक काळे, संतोष माळी, हर्षद साखरे, रोहन इंगळे आणि प्रविण सपताळे यांचा समावेश आहे.

बजाज ऑटो लिमिटेड ही देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी असून मोटरसायकल, स्कूटर तसेच तीनचाकी वाहन निर्मितीमध्ये तिचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली असून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कंपनीची वाहने निर्यात केली जातात.

या नामांकित कंपनीत फॅबटेक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत असून महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमांचे कौतुक होत आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख दत्तात्रय नरळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.