भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत यांनी तुतारीवरच निवडणूक लढवावी....

अनिलदादा सावंत यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात नागरिकांचे आवाहन

भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत यांनी तुतारीवरच निवडणूक लढवावी....

भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिलदादा सावंत यांनी तुतारीवरच निवडणूक लढवावी....

अनिलदादा सावंत यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात नागरिकांचे आवाहन

पंढरपूर - भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित केले आहे. याच अनुषंगाने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात त्यांनी  गावभेट दौरा आयोजित केला आहे. या गावभेट दौऱ्यात अनिल सावंत गावोगावी जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आगामी विधानसभा निवडणुकां संदर्भात लोकांच्या भावना जाणून घेत आहेत. विधानसभा निवडणुकीचा विषय निघाल्यास लोक " दादा.. निवडणूक लढवायची असल्यास शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून तुतारी चिन्हावरच लढा.."  असे लोक गावोगावी सांगत आहेत.

गत लोकसभा निवडणुकीपासून वारे बदलले असून सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची प्रामुख्याने शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या तुतारीची हवा असल्याचे दिसत आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जणू रस्सीखेच लागली आहे. भाजप नेते मा.आ. प्रशांत परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सध्या मतदारसंघात सुरू आहे. तसेच विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनीही दोन वेळा खा. शरद पवार यांची भेट घेतली आहे व उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय पंढरपूर तालुक्यातील परिचारकांचे समर्थक नागेश भोसले, वसंतनाना देशमुख यांनीदेखील शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी मागणी केली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री ना. तानाजीराव सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी देखील गत काही दिवसांनी खाली शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली. कारण संपूर्ण सावंत कुटुंबीय शिवसेनेत सक्रिय असताना अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेणे धक्कादायकच आहे. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी अनिल सावंत यांना भरपूर वेळ देत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली. चर्चा होऊन बाहेर आल्यानंतर अनिल सावंत यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. सावंत यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा त्यांची कार्यकर्ते करीत आहेत.  सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात गावभेट दौरा मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू केला आहे. याची चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे. 

एकूणात शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या तुतारीची पर्यायाने महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार यावर मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क सध्या बांधले जात आहेत. दरम्यान अनिल सावंत हे जोरात कामाला लागल्याचे दिसत आहेत