लक्ष्मी टाकळी परिसरात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका 

साठे बंधूंच्या प्रयत्नामुळे कोट्यावधींची कामे 

लक्ष्मी टाकळी परिसरात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका 

लक्ष्मी टाकळी परिसरात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका 

साठे बंधूंच्या प्रयत्नामुळे कोट्यावधींची कामे 

पंढरपूर - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशिर्वादाने व रोहयो मंत्री ना.संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या विशेष प्रयत्नातून  विविध विकास कामाच्या भूमिपूजनचा धूमधडाका सुरू आहे.

लक्ष्मी टाकळी येथील विविध विकास कामांचे मागील महिन्यातही भूमिपूजन झाले होते. मागील दोन दिवसांपूर्वी  श्रीराम नगर-२ मधील वाईकर घर ते माने घर पर्यंत 13  लक्ष रुपयेचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामधून काँक्रीट रस्ता होणार असल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख महेश  साठे यांच्यावरती विशेष आशीर्वाद आहे.यामुळेच या भागातील  अनेक रस्त्याचे भूमिपूजन होताना पाहायला मिळत आहे.

आजपर्यंतच्या इतिहासामध्ये लक्ष्मी टाकळी भागात कधीही एवढी विकासात्मक कामे पाहायला मिळाली नव्हती.परंतु या दोन वर्षांमध्ये  टाकळी भागात अनेक विकासात्मक काम  होताना दिसत आहे.जर नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती असेल आणि सेवाभाव असेल तर अशक्य असे काहीच नाही हे साठे कुटुंबाच्या निमित्ताने दिसून आलेले आहे. महेश साठे यांनी निधी मिळावीला आहे.या कामाचे श्रेय घेण्याच्या ऐवजी आणखी दुसऱ्या विकास कामासाठी साठे यांचे प्रयत्न सुरु आहे.यामुळे हे भूमिपूजन सरपंच संजय साठे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, उपसरपंच सागर सोनवणे , सदस्य औदुंबर ढोणे, सदस्य रेश्मा साठे, सदस्य रोहिणी साठे, चांगन सर, कदम सर, बापू माने, सोनू चव्हाण व  श्रीराम नगर-२ मधील सर्व ज्येष्ठ नागरिक व बंधू भगिनी उपस्थित होते*