फॅबटेक पाॅलिटेक्निक विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये दमदार एन्ट्री ; ग्रामीण भागातील गुणवत्तेचा पुन्हा ठसा
२६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड ; उद्योगविश्वात फॅबटेकचा दबदबा वाढला
फॅबटेक पाॅलिटेक्निक विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये दमदार एन्ट्री ; ग्रामीण भागातील गुणवत्तेचा पुन्हा ठसा
२६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड ; उद्योगविश्वात फॅबटेकचा दबदबा वाढला
सांगोला - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, कौशल्य आणि जिद्द असेल तर मोठ्या उद्योगसमूहांचे दरवाजेही सहज उघडू शकतात, हे पुन्हा एकदा फॅबटेक पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित आणि अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्स मध्ये तब्बल २६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली असून संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १२ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील १४ विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट प्रक्रियेत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून सिहान शेख, ऋषिकेश लेंढवे, प्रसाद मोळक, दिपक देसाई, हर्षद साखरे, मुबारक पटेल, शुभम मोटे, रोहन इंगळे, सुहास बनसोडे, साद पठाण, समर्थ जाधव आणि जयेश जाधव या विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून वेदिका पानसांडे, हर्षदा भुसनर, पृथ्वीराज चव्हाण, मयुरी कांबळे, प्राजक्ता गायकवाड, अनामिका तळेकर, स्नेहल अनुसे, श्रीराम क्षीरसागर, पूजा खांडेकर, प्रमोद चौगुले, साक्षी मासाळ, अजित कारे, संकल्प बुडबुडे आणि पायल भुसनर यांनी यश मिळवले.
टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मानली जाते. पॅसेंजर व्हेईकल आणि अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक मशीनरी, ऑटोमेशन, इंडस्ट्री प्रॅक्टिसेस आणि व्यावसायिक कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला भक्कम दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उद्योगाभिमुख शिक्षण, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, तांत्रिक कौशल्य वाढविण्यासाठी राबवले जाणारे उपक्रम आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य तानाजी बुरूंगले, मेकॅनिकल विभागप्रमुख दत्तात्रय नरळे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. महेश वाळूजकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फॅबटेकच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून “गावातूनही ग्लोबल कंपनीपर्यंत झेप घेता येते” हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.