पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दाखवले मोठे दातृत्व
पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी धोत्रे यांनी दिले स्वतःच्या चार एकर शेतातील चारा
पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दाखवले मोठे दातृत्व
पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी धोत्रे यांनी दिले स्वतःच्या चार एकर शेतातील चारा
पंढरपूर - मागील काही दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
ही बाब लक्षात घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मोठे दातृत्व दाखवत आपल्या स्वतःच्या शेतातील चार एकर क्षेत्रातील मका पिक पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिले आहे.

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांसोबत स्वतः मनसे नेते दिलीप धोत्रे शेतात उतरून काम करताना दिसले.
राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत सापडले असून त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पदाधिकारी अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत पुरवत आहेत.
काही दिवसापूर्वी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेत शेतकऱ्यांना आणि घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख स्वरूपाची मदत केली होती.

सध्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने पशुधनही वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली असून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील चार एकर उभे मक्या पिक काढून पूरबाधित शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा म्हणून दिल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजकारणा बरोबरच समाजकारनात अग्रेसर असलेले संवेदनशील नेते म्हणून परिचित असलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पशुधन वाचवण्यासाठी दाखवलेल्या दाक्तृत्वाचा आदर्श राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा.अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे,पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल आप्पा बागल, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार,संजय गायकवाड, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे इत्यादी उपस्थित होते.