मनसेच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन;विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षीस
मनसेच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन;विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षीस
पंढरपूर - गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस भेट देण्यात येणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत घरगुती आणि सार्वजनिक गणपती सजावटीत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि पारंपरिकतेसोबतच पर्यावरणपूरक सजावटीस प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

घरगुती गौरी गणपती सजावट करणारे नागरिक, महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.या उपक्रमाद्वारे लोकांमध्ये सणाविषयी जागरूकता वाढवणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे आणि स्थानिक कलागुणांना वाव देणे हे मनसेचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण केलेल्या सजावटीचा व्हिडिओ व्हाट्सअपद्वारे पाठवून सहभागी होऊ शकता. या स्पर्धेचे आयोजन धोत्रेज उद्योग समूहाच्या हॉटेल ग्रँड, ग्रँड ट्रॅक्टर्सच्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा ८०९०९२१११२ / ९५२११३०९०९ असे आवाहन करण्यात आले आहे.