अतिवृष्टीग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष,उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फटे यांच्याकडून मदत

अतिवृष्टीग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत

अतिवृष्टीग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष,उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फटे यांच्याकडून मदत

पंढरपूर - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी भेट देऊन तेथील अतिवृष्टी बाधित प्रत्येक कुटुंबांना राष्ट्रवादीच्या वतीने मोलाची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले.

यावेळी अतिवृष्टी बाधित नागरिकांशी संवाद साधताना नागेश फाटे म्हणाले की,अतिवृष्टी मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी उभी राहून सरकारला मदत करण्यास भाग पाडेल असा विश्वास फाटे यांनी दिला.

याप्रसंगी नवनाथ बचुटे, गणेश दुरुतकर, डॉ. माणिकराव मस्के, सरपंच महादेव मासाळ, ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे, सत्यवान मासाळ, आरपीआय युवा अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे, बिरुदेव मासाळ, दत्ता कांबळे, अरुण कांबळे, कोंडीबा मासाळ, निवास कांबळे, रुपेश कांबळे, संतोष कांबळे, सिद्राम मासाळ, हरिदास कांबळे, राजेंद्र रणदिवे, बाबासाहेब कांबळे, आनंदा कांबळे यांच्यासह गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.