नागेश फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
नागेश फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पंढरपूर - रष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यामध्ये रक्तदान शिबिर, अन्नदान, वृक्षारोपण, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांना विविध स्तरातील लोकांनी शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या मोठी होती.

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागातर्फे पंढरपूर मार्केट यार्ड कार्यालय येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये ५० जणांनी रक्तदान करण्यात आले.

मातोश्री वृद्धाश्रम येथे गोपाळपूर येथे श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी पंढरपूर शाखा च्या वतीने वयोवृद्ध निराधारांना भोजन देण्यात आले. देगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

राजकीय ,सामाजिक क्षेत्रात नागेश फाटे यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ,माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कल्याणराव काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुंभेच्छा दिल्या.

तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.