खेडभोसे येथे सरपंच आणि उपसरपंच यांचा नागरी सत्काराचे आयोजन

खेडभोसे येथे सरपंच आणि उपसरपंच यांचा नागरी सत्काराचे आयोजन

खेडभोसे येथे सरपंच आणि उपसरपंच यांचा नागरी सत्काराचे आयोजन

पंढरपूर - खेडभोसे चे नूतन सरपंच आणि उपसरपंच यांचा नागरी सत्कार उद्या बुधवारी (दि. 11) रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक माजी उपसरपंच पोपट पवार यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे ग्रामपंचायतीवर विठ्ठल परिवाराने आपला झेंडा फडकवला आहे. यामध्ये विठ्ठल परिवाराच्या सरपंच सुरेखा देवळे या जनतेमधून निवडून आल्या आहेत तर उपसरपंच पदी अश्विनी चंद्रकांत पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, मनसेचे दिलीप धोत्रे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते होणार आहे.

 या कार्यक्रमासाठी करकंब पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश तारु, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तलाठी प्रकाश भिंगारे, पत्रकार अण्णासाहेब पवार, सुनील कोरके, शहाजी काळे, ग्रामसेवक वैभव गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार यांनी दिली.