उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

पंढरपूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि उमा महाविद्यालय, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास "या ब्रीद वाक्यांतर्गत 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत गादेगाव आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे आमदार श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रा.से.यो पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ.संजय मुजमुले होते.
       
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रशांतराव परिचारक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे व्यक्तिगत जीवन विचारातून मुक्त होऊन समाज विकासाची भावना निर्माण होते . राष्ट्र प्रेमाची भावना वाढीस लागते  आणि नेतृत्व गुण विकसित होतो.यातूनच ग्रामीण भागाचा विकास साधला जाऊन महात्मा गांधीजींचे खेड्याकडे चला या संदेशाचे पालन होऊ शकते.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  डॉ.संजय मुजमुले यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी गावात केलेल्या श्रमाची प्रशंसा करून ते श्रम भावी जीवनात कसे उपयुक्त ठरतात याविषयी विवेचन केले.

याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने बोलताना पत्रकार शिवाजी शिंदे सर यांनी आपल्या मनोगतातून गावात राबविण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरामुळे गाव स्वच्छ झाल्याचे म्हटले.यावेळी उपसरपंच गणपत शिवाजी मोरे यांनी आपल्या मनोगतातून विशेष श्रम संस्कार शिबिरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करून यातून निर्माण होणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाविषयी विवेचन केले. तसेच उमा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी आपल्या मनोगतातून  विशेष श्रमसंस्कार शिबिरात राबविले गेलेले उपक्रम गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे पार पाडता आले असे विशद केले.याप्रसंगी महाविद्यालयातील कु. अनुजा चव्हाण व कु.अर्पिता दुनाखे या स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मा. सौ वंदनाताई मोहन बागल व युवा नेते प्रणव परिचारक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य ,प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ सर्वगोड एन.सी.यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.एन कावरे यांनी केले. कार्यक्रमाधिकारी प्रा.अविनाश देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.एस.के. शिंदे, प्रा.ए.डी.बनकर, प्रा.व्ही.एस. दाभोळकर प्रा.एस.डी. हजारे, प्रा.व्ही.आर होनमाने, सेवक गोरख खताळ यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी गादेगाव येथील ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहूसंख्येने उपस्थित होते.