फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील ४८ विद्यार्थ्यांची "हरमन इंटरनॅशनल" कंपनीत निवड
फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील ४८ विद्यार्थ्यांची "हरमन इंटरनॅशनल" कंपनीत निवड
सांगोला - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यामध्ये अग्रस्थानी असलेल्या सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ पाॅलिटेक्निकने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तब्बल ४८ विद्यार्थ्यांची "हरमन इंटरनॅशनल" या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही निवड अत्यंत अभिमानास्पद मानली जात असून, फॅबटेक पाॅलिटेक्निकच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची ही ठळक पावती मानली जात आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर आधारित प्रशिक्षण, उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती, आधुनिक प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्राशी असलेला सातत्यपूर्ण समन्वय यामुळे फॅबटेकच्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून मोठी मागणी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
हरमन इंटरनॅशनल ही सॅमसंग समूहाची एक अग्रगण्य कंपनी असून कार इन्फोटेनमेंट सिस्टीम, कनेक्टेड टेक्नॉलॉजी, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स तसेच उच्च दर्जाच्या ऑडिओ उत्पादन निर्मितीसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. घर, वाहन आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक साऊंड व डिजिटल सोल्युशन्स विकसित करण्यामध्ये कंपनी अग्रस्थानी आहे. त्यामुळे या कंपनीत विद्यार्थ्यांची निवड होणे हे त्यांच्या करिअरसाठी मोठे यश मानले जात आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजनंदिनी यादव, वेदिका पानसंदे, शाहिस्ता शेख, प्राची पाटील, विद्याराणी आसबे, श्रेयश घाडगे, रोहित रोंगे, प्रतीक क्षीरसागर, रोहन लेंडवे, अमोल कोरे, श्रीराम क्षीरसागर, संकल्प बुधबुडे, तुकाराम होनमाने, कृष्णा ताजव, ओंकार राजगे, संदेश बेहेरे, प्रमोद चौगुले, ओंकार पाटील, रितेश शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विराज शेलके, अनामिका तळेकर, प्राजक्ता गायकवाड, प्रतीक्षा लवटे, साक्षी मासाळ, साक्षी काळे, स्नेहल अनुस, रोहन इंगोले, पृथ्वीराज गोडसे, पृथ्वीराज नवले, सुशांत लेंढवे, प्रथमेश कांबळे, पायल भूषण, पूजा खांडेकर, सुवर्णा होनमाने, हर्षदा भुसनर, सानिका भोसले, संजना पाटोळे, करुणा जगदाळे, प्रज्ञा जगदाळे, श्रीराम राजश्री, अनुष्का गायकवाड, जान्हवी लोंढे, मयुरी कांबळे, प्रतीक्षा लेंडवे, आकांक्षा कदम, सिमरन मुलाणी व ज्योती पुजारी यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी बुरूंगले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून येऊन जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

फॅबटेक पाॅलिटेक्निक महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारे संस्थान नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणारे आणि उद्योग क्षेत्रासाठी सक्षम तंत्रज्ञ घडविणारे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची फॅबटेककडे वाढती पसंती दिसून येत असून, यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमुळे महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.