डॉ.बी.पी. रोंगे यांच्या नावाची चर्चा
डॉ.बी.पी. रोंगे यांच्या नावाची चर्चा
पंढरपूर - महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी होणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या आमदारकीची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे. तसे सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे.
जिल्ह्यातील विविध पक्षाच्या उमेदवारांची शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी इच्छुकांचीही भाऊगर्दी वाढत असून यात प्रामुख्याने करमाळ्याचे महेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थेचे प्रमुख असून स्वेरीचे अध्यक्ष प्रा.डॉ. बी.पी. रोंगे तसेच माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्याशिवाय जिल्हयातील अजून दोन इच्छुकांची संख्या पुढे येत आहे.

गेल्या कांही वर्षात श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे निर्माते प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी त्यांच्या अनेक सहकारी मित्रांच्या आग्रहावरुन शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे अनेक मुद्दे मुंबईपर्यंत चांगलेच धडकले असून याचा परिणाम म्हणून शिक्षक मतदार संघातून त्यांच्या नावाला अधिक दुजोरा मिळत असल्याचे दिसून येते.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा चालू असून या चर्चेतून सुद्धा रोंगे यांच्या नावाला अधिक अनुमोदन मिळत असल्याचे दिसून येते. शून्यातून विश्व निर्माण करुन जिल्ह्यात एक नंबरची शिक्षण संस्था म्हणून नावारुपाला 'स्वेरी' चे नाव बहुचर्चित असल्याने रोंगे यांच्या नावाला मान्यता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही राजकीय जाणकारात चर्चिले जात आहे.