शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी आ.रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी आ.रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी आ.रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार

पंढरपूर : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र ही कर्जमाफी जाहीर करताना नियम व अटी लावण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शासनाने कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र नंतर दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार 12 जून पासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.१२ जून रोजी सकाळी ८ वाजता आमदार रोहित पवार पंढरपुरात दाखल होणार असून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, नगरप्रदक्षिणा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आमदार नेते पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत.

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती शासनाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. यामुळे लाडकी बहीण व शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान केले. यामुळे पुन्हा महायुती सत्तेवर आली. यानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला असल्याचे दिसून आले. शासन कर्ज माफी जाहीर करेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र दीड वर्ष झाले तरी शासन कर्ज माफी जाहीर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी शासनाला कर्जमाफी वरून धारेवर धरले. यामुळे शासनाने अखेर शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कर्जमाफी देताना नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. शासनाने कर्जमाफीचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले आहे. मात्र नियम व अटी लावण्यात आल्यामुळे सुमारे 15 ते 17 लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. यामुळे शासनाने कर्जमाफी

जाहीर करावी या मागणीसाठी 12 जून रोजी आमदार रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहे. या आंदोलनास अनेक जण पाठिंबा देणार आहेत. अन्नत्याग आंदोलनाची तयारी करण्यासाठी पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक झाली. या बैठकीस नागेश फाटे, दीपक वाडेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र दोन लाख रुपयाची कर्जमाफी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.