पंढरपुरातील विविध विकास कामाची आ.समाधान आवताडे, माजी आ.प्रशांत परिचारक यांनी केली पाहणी
लवकरात लवकर आणि दर्जेदार काम करण्याच्या प्रशासनाला सूचना
पंढरपुरातील विविध विकास कामाची आ.समाधान आवताडे, माजी आ.प्रशांत परिचारक यांनी केली पाहणी
लवकरात लवकर आणि दर्जेदार काम करण्याच्या प्रशासनाला सूचना
पंढरपूर - पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नामसंकीर्तन सभागृह, राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या कामाची शनिवारी आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त पाहणी केली.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी कामाची सध्याची स्थिती जाणून घेऊ अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर आणि दर्जेदार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच भाजपा व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, पंढरपूर नगर परिषदेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की शहरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून उद्यानासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात आला. जवळपास एक वर्षापासून जिजामाता उद्यानाचे काम सुरू होते. नागरिकांच्या मागणीनुसार लोकार्पण करण्यात आले.

उद्घाटनादरम्यान काही काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले होते. त्यावेळेस कामाची पाहणी करून उद्यान चालू असताना काम पूर्ण करून घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कामाची पाहणी करून अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तात्काळ उपाय योजना न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार आवताडे यांनी यावेळी दिला.

याचबरोबर नामसंकीर्तन कीर्तन सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून आषाढी वारीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.