फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात

आई-वडिलांच्या स्वप्नांचा मान राखा, व्यसनांपासून दूर राहा – प्रा. ए.आय. मुजावर

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात

आई-वडिलांच्या स्वप्नांचा मान राखा, व्यसनांपासून दूर राहा – प्रा. ए.आय. मुजावर

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात

सांगोला - आई-वडिलांची मान खाली जाईल असे कधीही वागू नका. उत्तम संस्कार, चांगले चारित्र्य आणि आदर्श आचरण हीच पालकांची खरी संपत्ती असते असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा. ए. आय. मुजावर यांनी फॅबटेक पाॅलिटेक्निक मधील व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.

फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, सांगोला मध्ये दिनांक १० व ११ जून २०२६ रोजी व्यक्तिमत्व विकास या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून दिले. पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट घेत असतात. त्यांच्या त्यागाचे चीज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आजचे युग स्पर्धेचे असून प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यासाठी ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, चांगल्या सवयी अंगीकारून समाजात आदर्श नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला. "आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करणे हेच प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिले कर्तव्य आहे असल्याचे त्यांनी सागितले.

ही कार्यशाळा फॅबटेक पॉलिटेक्निक मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होती. कार्यशाळेच्या सुरुवातीस व्याख्याते प्रा. ए आय मुजावर यांचे प्रा. अनिल वाघमोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन आणि जीवनमूल्यांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेतले. ह्या कार्यशाळेचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नागेश लेंगरे यांनी केले. हि कार्यशाळा प्राचार्य तानाजी बुरूंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल वाघमोडे, प्रा. बापू गुंजाळ, प्रा. गणेश औताडे, प्रा. खंडू साळवे, प्रा. संगिता खंडागळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.