मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
मंगळवेढा येथे मराठा महासंघाचे शाखांचे उद्घाटन व नागरी सत्कार
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दश्रम येथे फराळाचे वाटप
मंगळवेढा येथे मराठा महासंघाचे शाखांचे उद्घाटन व नागरी सत्कार
पंढरपूर - अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंहगर्जना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण
यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.शनिवार दि. २९ जुलै रोजी मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कै. आ.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागस विकास महामंडळाचे मोफत रजिस्ट्रेशन (LOI) व प्रोजेक्ट रिपोर्ट,काढून देण्याचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटील,जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रजिस्ट्रेशन (LOI) व प्रोजेक्ट रिपोर्टचे वाटप यावेळी करण्यात आले.

तसेच अ.भा.मराठा महासंघ महिला व युवती आघाडी पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम,गोपाळपूर येथे फराळाचे वाटप करण्यात आले.

मंगळवेढा येथे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अ.भा.मराठा महासंघ शहर व तालुका यांच्या वतीने मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने अर्जुनराव चव्हाण यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक बबनराव आवताडे, महिला जिल्हाध्यक्षा गायकवाड, अँड. प्राजक्ता शिंदे, मुरलीधर दत्तू, राजेंद्र सुरवसे,अजित जगताप, चंद्रशेखर कॉडुभैरी, सोमनाथ आवताडे,ज्ञानेवर फुगारे,सतीश दत्तू,शिवाजी वाकडे, शिवाजी मोरे,शेखर इंगळे, शिवाजी जावळे, तालुकाध्यक्ष सचिन डोरले, शहराध्यक्ष आण्णा आसबे युवक शहराध्यक्ष आण्णा ओमने तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अजित जगताप, सोमनाथ आवताडे, बिस्किटे यांनीही आपल्या मनोगतातून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.तसेच वाढदिवसानिमित्त मुकबधीर प्रशालेत मुलांना खाऊ वाटत करण्यात आला. तसेच याप्रसंगी शिवप्रेमी चौक, नागणेवाडी, बोराळे खोमनाळ नाका, धर्मगाव रोड, शिस्नादगी आदी शाखेचे उद्घाटन अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी नागणे, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सचिन डोरले यांनी मानले.