पंढरीत आजपासून राज्यस्तरीय सब-ज्युनियर मैदानी स्पर्धेचे आयोजन

अजिंक्य स्पोर्ट्स ॲकॅडमी कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांची माहिती

पंढरीत आजपासून राज्यस्तरीय सब-ज्युनियर मैदानी स्पर्धेचे आयोजन

पंढरीत आजपासून राज्यस्तरीय सब-ज्युनियर मैदानी स्पर्धेचे आयोजन

अजिंक्य स्पोर्ट्स ॲकॅडमीचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांची माहिती

पंढरपूर - महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन, सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय सब-ज्युनियर मैदानी स्पर्धेचे आयोजन दि.२३ फेब्रुवारीपासून पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथील मैदानावर करण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.समाधान अवताडे भूषविणार आहेत.सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून मा.आ.दत्तात्रय सावंत सर, प्राचार्य डॉ. बी.एस नाईकनवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य स्पोर्ट्स ॲकॅडमीचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष मस्के सर आणि चेतन धनवडे यांनी केले आहे.

राज्यभरातील बालयुवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार असून, खेळाडू आणि पालक मिळून सुमारे 4000 हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. 
स्पर्धेच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळणार असून, मैदानी क्रीडाप्रकारांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

स्पर्धेच्या आयोजनात अजिंक्य स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रा.सुभाष मस्के सर चेतन धनवडे आणि त्यांचे सहकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.