पंढरपुरात क्रेडाई गृहोत्सवाचे उद्घाटन

पंढरपुरात क्रेडाई गृहोत्सवाचे उद्घाटन

पंढरपुरात क्रेडाई गृहोत्सवाचे उद्घाटन

पंढरपूर - क्रेडाई पंढरपूरच्या वतीने 'क्रेडाई गृहोत्सव २०२६' या प्रदर्शनाचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, प्रणव परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

याप्रसंगी सचिव आशिष पोखरणा, क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा, उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, पीआरओ मिलिंद वाघ, वूमन विंग को-ऑर्डिनेटर श्रिया शिरगावकर, युथ विंगचे यश देशपांडे, क्रेडाई पंढरपूरसह, वुमन विंग, युथ विंगचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

आमदार समाधान आवताडे यांनी शुक्रवारी दुपारी या प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सला भेट दिली. 

क्रेडाई, गृहोत्सव २०२६ प्रदर्शनाचे १६ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये येथील रेल्वे ग्राउंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशांत परिचारक म्हणाले, क्रेडाई गृहोत्सव प्रदर्शनाच्या माध्यमातून पंढरपूरमधील नागरिकांना आधुनिक घरांचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. प्रणिता भालके, म्हणाल्या, क्रेडाई गृहोत्सव हे प्रदर्शन, बांधकाम व्यावसायिक आणि घरू खरेदीदार यांच्यामध्ये संवादाचे माध्यम आहे. बांधकाम व्यवसाय विकासक आणि सर्व ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर शोधण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.

या प्रदर्शनामध्ये पंढरपूरमधील विविध गृह प्रकल्पातील फ्लॅट्स, रो-हाऊसेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, ओपन प्लॉट्स, बांधकाम क्षेत्रातील सप्लायर्स, मटेरियल विक्रेते, होम लोन इन्स्टिट्युशन्स आणि नवीन तंत्रज्ञानासह एकूण १२० स्टॉल्सचा समावेश आहे.