नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे यांच्या जन कार्यालयाचे उदघाटन

प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या समस्या सुटणार जागेवरच

नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे यांच्या जन कार्यालयाचे उदघाटन

नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे यांच्या जन कार्यालयाचे उदघाटन

प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या समस्या सुटणार जागेवरच

पंढरपूर - पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 17 येथे नव्याने विजयी झालेल्या नगरसेविका सौ.माधुरी दिलीपबापू धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ.अभिजीत पाटील, विठ्ठल परिवाराचे नेते तीर्थक्षेत्र  विकास आघाडीचे प्रमुख भगीरथदादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख,शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश नाना साठे,यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉ.प्रणिताताई भालके यांचेसह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे निवडणूक लढविलेले सर्व उमेदवार  आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे विजयी उमेदवार यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रभागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देण्याचे आश्वासन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिले आहे.यामुळे पुन्हा एकदा नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.