प्रभाग क्रमांक १७ साठी माधुरी दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ - प्रभाग क्रमांक १७ साठी माधुरी दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक २०२५ - प्रभाग क्रमांक १७ साठी माधुरी दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
संतपेठ परिसरातील बहुचर्चित असलेल्या प्रभाग क्रमांक १७ मधून रविवारी सौ.माधुरी दिलीप धोत्रे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी येथील मतदारांच्या आग्रहाखातीर प्रभाग क्रमांक १७ मधून माधुरी दिलीप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

अनेक वर्षांपासून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शहरातील अनेक प्रश्नांवर आवाज उठून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. याचबरोबर स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवने तसेच विविध विकास कामे करून त्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम केल्याने प्रभाग क्रमांक १७ चा सर्वांगीण विकासासाठी नागरिक माधुरी धोत्रे यांच्या रूपाने सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर बहुतांश संतपेठ परिसरात असलेल्या या प्रभागावर स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या विचाराचा प्रभाव असल्याने या प्रभागातून कायम भालके यांना विधानसभेत निर्णायक आघाडी घेण्याचे काम केल्याने नगरपालिका निवडणुकीत या प्रभागातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.