मराठा महासंघाच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी शिवाजी मोरे निवड
मराठा महासंघाच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी शिवाजी मोरे निवड
पंढरपूर - अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी मराठा महासंघाच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष पदी शिवाजी मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील शिवाजी मोरे यांची समाजासाठी काम करण्याची असलेली आवड तसेच मराठा समाजातील तरुणांच्या अडचणी सोडवण्याची काम व गेल्या अनेक वर्षापासून संघाचे केलेले काम तसेच समाजातील गरीब,वंचित, पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक क्षेत्राची आवड पाहून शिवाजी मोरे यांची सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असल्याचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम,इसबावी अध्यक्ष सुनील घाडगे,महिला शहराध्यक्षा डॉ संगीत पाटील, तालुका अध्यक्षा रतनताई थोरवत, तालुका उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे,विजयाताई खामकर यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.