भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी वाघमारे यांची निवड
जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी वाघमारे
जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी वाघमारे
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी बालाजी वाघमारे यांची निवड
पंढरपूर - भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा (पूर्व) सरचिटणीस पदी बालाजी वाघमारे यांच्या निवडीचे पत्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. चांगदेव कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अ.जा. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिग आर्य, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मा.पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख,माजी आ.प्रशांत परिचारक,अ.जा.मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे

यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संघटन वाढीसाठी अधिक सक्रिय योगदान यापुढेही असेच द्याल ही अपेक्षा यावेळी भाजपा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी पंढरपूर बाजार समितीचे हरिष गायकवाड तसेच मान्यवरांनी बालाजी वाघमारे यांना नियुक्तीबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.