दिपावली - २०२५ - धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
दिपावली - २०२५ - धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
पंढरपूर - वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले असल्याचे माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोने मुकुट,नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, शिरपेच लहान, मस्त्य जोड, तोडे जोड, एकदाणी तुळशीची माळ ३ पदरी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
तसेच दिपावलीत वसुबारस, धनत्रयोदशी दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवन, श्री.ज्ञानेश्वर दर्शन मंडप व भक्त निवास इत्यादि ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.