वाराणसीच्या धरतीवर पॉलिटिकल पावरने पंढरपूरचा विकास शक्य - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
गृह उत्सव 2024 प्रदर्शन व विक्री शिबिराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.
वाराणसीच्या धरतीवर पॉलिटिकल पावरने पंढरपूरचा विकास शक्य - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
गृह उत्सव 2024 प्रदर्शन व विक्री शिबिराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.
पंढरपूर - पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी सरकार उपलब्ध करून देत आहे. वाराणसीच्या धरतीवर पंढरपूरचा विकास पॉलिटिकल पावरने शक्य आहे. यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, उमेश परिचारक यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
क्रेडाई समूह पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या गृहउत्सव २०२४ या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तसेच शांतीलाल कटारिया, सुनील फुरडे,आ.समधान अवताडे, उमेश परिचारक, प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
गृह उत्सव 2024 या प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर क्रेडाई पंढरपूर अध्यक्ष अमित शिरगावकर, उपाध्यक्ष आशिष शहा, सचिव मिलिंद देशपांडे, खजिनदार संतोष कचरे, शशिकांत सुतार आदी उपस्थित होते.
फ्लॅट्स,बंगलोज, रो हाऊसेस, ओपन प्लॉटस्, शॉप्स, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, होम लोन याबाबतची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पंढरपुरात ग्रह उत्सव 2024 या प्रदर्शन व विक्री शिबिराचे आयोजन क्रेडाई पंढरपूर यांच्या वतीने येथील रेल्वे मैदान येथे करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दिनांक १९ ते २१ जानेवारी २०२४ या दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पार पडणार आहे.