पंढरीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 

नगरपालिका शाळा क्र. ७ व ९ नव्या इमारतीसह शाळा हायटेक करणार – दिलीप धोत्रे

पंढरीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 

पंढरीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप 

नगरपालिका शाळा क्र. ७ व ९ नव्या इमारतीसह शाळा हायटेक करणार – दिलीप धोत्रे

पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील नगरपालिका शाळा क्रमांक ९ मध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नगरपालिका शाळा क्रमांक ९ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचे नमूद करत शाळा क्रमांक ९ आणि शाळा क्रमांक ७ या दोन्ही शाळांच्या इमारती पुढील काळात नव्याने उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर करत विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे योगदान मोलाचे असल्याचे अधोरेखित करत दिलीप धोत्रे यांनी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, नगरसेवक लोकेश यादव, संतोष सर्वगोड, शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर, श्रीमंत यादव, दिनेश पांढरे, विवेक शिंदे, कटके काका, संतोष वाघमारे, अंबादास वायदंडे, लक्ष्मण रणदिवे, पिंटू गायकवाड, आकाश बंदपट्टे, विकी विटकर, दत्ता थोरात, महेश यादव, शुभम गरड, लखन सर्वगोड, मनोज गोसावी, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागर, शिक्षक संतोष भांड यांच्यासह प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक नागरिक उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र ब्रिलियंट सर्च परीक्षेत पंढरपूर केंद्रात शाळा नंबर 9 मधील विद्यार्थिनी तनुश्री सतीश वाघमारे हिने आठवा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सन्मान धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.