आषाढी वारीत महाप्रसाद वाटपाची नेहतराव कुटुंबाची ४० वर्षाची परंपरा
आषाढी वारीत महाप्रसाद वाटपाची नेहतराव कुटुंबाची ४० वर्षाची परंपरा
आजोबांनी सुरू केलेली परंपरा तिसऱ्या पिढीत
पंढरपूर - आषाढी यात्रेनिमित्त भाविक भक्तांची सेवा घडावी या उद्देशाने आजोबांनी सव्वा कीलो पासून सुरू केलेली महाप्रसादाच्या वाटपाच्या नियोजनाची परंपरा तिसऱ्या पिढी पर्यंत १ टनापर्यंत गेली आहे.

गेली ४० वर्षापासून आषाढी यात्रेत महाप्रसाद वाटपाची परंपरा पंढरपुरातील नेहतराव कुटुंबाकडून तिसऱ्या पिढीत पोहचली आहे.
सध्या त्यांची तिसरी पिढी हि अन्नदानाची परंपरा जोपासत आहेत.

आषाढी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी लक्ष्मी उद्योग समूहाच्या माध्यमातून नगरसेवक संतोष नेहतराव मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन पंढरपूर येथील हॉटेल लक्ष्मी पॅलेस समोर केबीपी कॉलेज लगत करण्यात आले आहे. या महाप्रसादात वैशिष्ट्यपूर्ण केलेली भगर आणि आमटीचा गरमागरम स्वाद आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक घेत आहेत.
दशमी आणि एकादशी या दोन दिवस चालणाऱ्या या महाप्रसादाचा चार ते पाच लाख भाविक लाभ घेतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नेहतराव कुटुंबाकडून देण्यात आली आहे.