पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीने महाप्रसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने निष्ठावंतांचा पंढरीत उपक्रम

पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीने महाप्रसाद

पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीने महाप्रसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने निष्ठावंतांचा पंढरीत उपक्रम

पंढरपूर -आषाढी वारी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी  शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने विठ्ठल भक्तांची सेवा घडावी या उद्देशाने गतवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानक, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास समोर आरती मंडप मनमाडकर मठ, प्रबोधनकार ठाकरे चौक या तीन ठिकाणी करण्यात आले आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे दशमी एकादशी आणि बारस या तीन दिवस चालणाऱ्या या महाप्रसाद कार्यक्रमात अस्सल तुपातील गोड शिरा, दोन प्रकारच्या भाज्या, चपाती, भात हे पदार्थ तर एकादशी दिवशी साबुदाणा खिचडी, केळी यासह फराळाचे वाटप करण्यात यात आहे.

एका ठिकाणी दिवसभर एक लाख भाविक महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी चंद्रभागा नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात भव्य असा शामियाना उभारण्यात आला असून भाविकांना महाप्रसाद घेण्यासाठी पंखे, कुलर लावून खास डायनिंग टेबलची व्यवस्था करण्यात आल्याने भाविक समाधान व्यक्त करत आहे.

या महाप्रसाद कार्यक्रम ठिकाणी शिवसेना सचिव राम रेपाळ, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे,ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोतवाणी, नगरसेवक दिलीप बारटक्के, रोहित गायकवाड, रवी आमले, विजय तांडेल, संतोष बोडके, संजय सोनी, शशी पाटील, महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिताताई माळगे, प्रियांका परांडे, सागर गोडसे, योगेश गायकवाड, सारंग साठे, कृष्णा साठे, समर्थ साठे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राम रेपाळ यांनी राज्यभरातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात या येणाऱ्या भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने गतवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.पुढील काळात राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदे यांना मिळावा असे साकडे विठ्ठलाला घातले.

यावेळी बोलताना महेश साठे म्हणाले की आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आले आहे.यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करत आहे.भाविकांना स्वादिष्ट अशा गोडधोड पदार्थाचे पंचपक्वान्न भोजन दिले जात आहे.सोबत पाण्याची बाटली तसेच आषाढी एकादशी दिवशी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिवसभरात एका ठिकाणी एक लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे सांगितले.