राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात वक्तृत्व स्पर्धा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात वक्तृत्व स्पर्धा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेत्यांचे वाढदिवस डिजीटल बोर्ड, विविध ठिकाणी लाखो रूपये खर्च केले जातात परंतू खऱ्या अर्थाने वक्तृत्व स्पर्धे च्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आपल्या
अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही नक्कीच चांगली बाब आहे, असे गौरवोद्रार पंढरपूरचे सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. मनोज भायगुडे यांनी काढले.

स्पर्धेचे उद्घाटन पंढरपुरातील नेत्रतज्ञ डॉ. मनोज भायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी समाधान काळे, साईनाथ बडवे, मुन्ना भोसले, सुनिल भोसले, लाला पानकर, कृष्णा वाघमारे, अॅड. अमित नेहतराव, अनिकेत शिरसट, संग्राम अभंगराव, युवराज म चलंबे, विशाल आवें, समाधान गाजरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढील वर्षी वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यात प्रथम क्रमांकासाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे, यासाठी १ लाखांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केले.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटातून ऋतुजा पोवार (इचलकरंजी), तेजस पाटील (पुणे) यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. दुसरा क्रमांक आकाश मोहिते (अहिल्यानगर), रोहन कवडे (पुणे) यांना तिसरा क्रमांक तर उत्तेजनार्थ अभिजीत लामकाने (पंढरपूर), मोनाली पाटील (पंढरपूर), प्रथम गणेश भिंगारे (पानीव) यांना देण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक साक्षी चव्हाण (सुस्ते), दुसरा निलश्री यादव(सातारा), तिसरा राजवीर तळेकर (भोसे) यांना तर उत्तेजनार्थ सृष्टी माने (निमगांव), श्रुती देठे (वाडीकुरोली), आरोही मारेकर (बागल वस्ती) यांना देण्यात आला.
स्पर्धेत ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परिक्षक म्हणून दादासाहेब तळेकर, योगेश गायकवाड, प्रा. परमेश्वर झांबरे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम पवार, सारंग महामुनी, प्रदिप निर्मळ, रफिक मुलाणी, अभिनव शिंदे यांनी परिश्रम घेतले.