गादेगावचा सुपुत्र झाला  समाजकल्याण अधिकारी ; प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान

प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान

गादेगावचा सुपुत्र झाला  समाजकल्याण अधिकारी ; प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान

गादेगावचा सुपुत्र झाला  समाजकल्याण अधिकारी ; प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान

पंढरपूर - गादेगांव,ता.पंढरपूर येथील  रहिवासी आणि बसपाचे नेते भालचंद्र कांबळे यांचे चिरंजीव रोहन भालचंद्र कांबळे यांनी,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत समाज कल्याण अधिकारी (राजपत्रित अधिकारी - क्लास २) या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सदरची निवड झाल्यामुळे गावाचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.रोहन कांबळे यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रम, संयम, व अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पदामुळे गादेगावची भूमी पुन्हा एकदा आपल्या सुपुत्रामुळे सन्मानित झाली आहे.

या सन्मान वेळी यावेळी डॉ रमेश फाटे, माणिक मस्के,विनय शिंदे, संग्राम कापसे, शर्विन फाटे, भालचंद्र कांबळे,यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते