अनिल सावंत यांच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; तरुणांचे स्वप्न होणार साकार
रविवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन, 4,500 जागांची मागणी
अनिल सावंत यांच्यावतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; तरुणांचे स्वप्न होणार साकार
रविवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन, 4,500 जागांची मागणी
पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनिल सावंत आयोजित रोजगार मेळावा रविवारी दिनांक 6 ऑक्टोंबर 2024 सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. ठिकाण - श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड ,पंढरपूर या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

अनिल सावंत यांच्याकडून सातत्याने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या काही आठवड्यापासून सावंत यांनी महिलांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावे, यासाठी खेळ पैठणी या कार्यक्रमाचे वारंवार आयोजन केले होते.
आता पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी, यासाठी रोजगार मेळावा होणार असल्याने, तरुणांना नोकरीचे आपले स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.
चाळीसहून अधिक कंपन्यांना रोजगार मेळाव्यासाठी आमंत्रित केले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण सर्व कंपन्यांना मिळून 4,500 जागांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे गुणवंत तरुणांकडे नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.विशेष म्हणजे पाचवी पास पासून पदवीव्युतर तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.