मनसेच्या वतीने राजे ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ; वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठरले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
वसंत हंकारे यांचे व्याख्यान ठरले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक
मनसेच्या वतीने राजे ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
पंढरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी न समजलेले आईबाप या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात वसंत हंकारे यांनी न समजलेले आई बाप हा विषय विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडताना विद्यार्थी आणि पालकांना अक्षरशः डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर दहावी,बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मानाचा मानला जाणारा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व महिला भगिनींच्या पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर वसंत हंकारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिद्दे, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ कोळी, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, बालाजी वाघ,

विभागाध्यक्ष नागेश इंगोले, महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले, माजी नगरसेवक शिवाजी मस्के, मोहम्मद वस्ताद, बालाजी गोवे, भारती चौगुले, नारायण गोवे, चंदू पवार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.