संधी मिळाल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार - मा.मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची पंढरीत प्रतिक्रिया
संधी मिळाल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार - मा.मंत्री लक्ष्मणराव ढोबळे
पक्षाकडे उमेदवारी मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली!
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची पंढरीत प्रतिक्रिया
पंढरपूर - लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक विद्यमान खासदारांना भाजपा नारळ देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आपणही आपली उमेदवारी मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये भाजप पक्षाकडून जो आदेश येईल ती आपल्यासाठी बंधनकारक राहील. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पंढरीत दिली आहे.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पंढरपूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यभरात असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे जोमाने कार्य केल्याने याची दखल घेऊन संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी त्यांनी देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे.भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच समान नागरी कायदा आणण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील,असा विश्वास व्यक्त केला.