राष्ट्रवादी पंढरपूर शहराध्यक्षपदी दिगंबर सुडके यांची निवड

राष्ट्रवादी पंढरपूर शहराध्यक्षपदी दिगंबर सुडके यांची निवड

राष्ट्रवादी पंढरपूर शहराध्यक्षपदी दिगंबर सुडके यांची निवड

पंढरपूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी दिगंबर सुडके यांची निवड करण्यात आली‌.यावेळी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आमदार दिपक आबा साळुखे - पाटील यांचे निकटवर्ती असलेले दिगंबर सुडके यांनी यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी मराठा सेवा संघाचे पद भूषविले आहे. त्याचबरोबर केदार शिक्षण प्रसारक मंडळ तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी सोडणविणे असे विविध कामे कारीत असतात.

पंढरपूर शहरातील सर्व समाजातील नेते मंडळींशी दिगंबर सुडके यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत.पंढरपूर शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क असून पक्षवाढीसाठी निश्चितच त्यांचा फायदा होणार आहे.दिगंबर सुडके यांच्या निवडीने समाजातील सर्वच क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.