छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारोप

छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारोप

पंढरपूर - गेली कित्येक वर्षापासून टाकळी रोड परिसरातील शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांनी आपल्या छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीराम नगर टाकळी रोड या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिवजन्मोत्सव सोहळा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, स्वेरीचे डॉ. बी.पी रोंगे, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले, मा. जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, पंचायत समिती सदस्य अरुण घोलप,डॉ.बोधले तालुका आरोग्य अधिकारी, यासीन शेख विधीज्ञ, दीपक वाडदेकर, किरण घाडगे, अर्जुन चव्हाण,महादेव देटे,बापू कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच शिवजयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रांगोळी स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमधून असंख्य शिवप्रेमी भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता.

तसेच दिनांक २० फेब्रुवारी रोजी डान्स स्पर्धा, पाककला स्पर्धा,पोती उडी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली.तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे हे सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, विविध आरोग्य शिबिर,अन्नदान, अशा समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवा करीत असतात. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून आपले कार्य ते सातत्याने करीत असतात.

शिवजन्मोत्सव सोहळा हा कार्यक्रम पार पाडण्यास महेश साठे यांचे मित्र मंडळ व असंख्य शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच स्पर्धा कमिटीचे प्रमुख बाबासाहेब दराडे सर, संदीप खेडकर सर,सौ. सविता पवार मॅडम यांनी हा संपूर्ण कार्यक्रम व स्पर्धा या यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचं सहकार्य दिले.