शिवसैनिकांचा पंढरपूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

शिवसेनेच्या आंदोलनाची महावितरणने घेतली दखल...

शिवसैनिकांचा पंढरपूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

शिवसैनिकांचा पंढरपूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या.

आंदोलनाची दखल घेत विज तोडणे थांबवण्याचे महावितरणचे आदेश : संभाजी शिंदे

पंढरपूर - कोणतीही पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये. या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व तालुकाप्रमुख संजय घोडके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पंढरपूर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

यावेळी उमेश काळे, बाळासाहेब पवार, वसंत आदमिले, पांडुरंग कदम, गणपत व्यवहारे, भारत व्यवहारे, महेश इंगोले, पोपट इंगोले, मनोज डंपाळ, विलास माने, किशोर गाडगे, समाधान गोरे, युवा सेना तालुका समन्वयक रणजित कदम, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बोराडे, 
युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, शहर समन्वयक स्वप्निल गावडे, युवा सैनिक विशाल डोंगरे, विलास चव्हाण, बाळासाहेब आसबे, विनायक वनारे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

यानंतर सर्व शिवसैनिकांनी भेट महावितरणचे कार्यालय गाठले व अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच ठिय्या मारला.
उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतातील उभी पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब समोर आणून दिली.

यानंतर सदर अधिकाऱ्यांनी आलेल्या शिष्टमंडळाला वीज पुरवठा खंडित करू नये अशा सूचना देणार असल्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या मारून बसलेल्या शिवसैनिकांनी आपले आंदोलन स्थगित केले.यामुळे सामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.