गादेगावच्या सुयोग फाटे यांची भरारी: एकाच वर्षात मजल मारली दोन शासकीय पदांना; गादेगावचे नाव उंचावले

गादेगावच्या सुयोग फाटे यांची भरारी: एकाच वर्षात मजल मारली दोन शासकीय पदांना; गादेगावचे नाव उंचावले

गादेगावच्या सुयोग फाटे यांची भरारी: एकाच वर्षात मजल मारली दोन शासकीय पदांना; गादेगावचे नाव उंचावले

पंढरपूर,गादेगाव - गादेगाव येथील शिवाजी संभाजी फाटे यांचे सुपुत्र सुयोग शिवाजी फाटे यांनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर शासकीय परीक्षेत यश संपादन करत गावाचा लौकिक वाढविला आहे. सुयोग यांनी अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 'महसूल सहाय्यक' आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत 'एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट' अशा दोन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातली आहे.

पुणे येथील नामांकित शाहू कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुयोग यांनी आपल्या अभ्यासात सातत्य आणि मेहनतीची जोड देत हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

ह्या यशात त्यांचे वडील शिवाजी संभाजी फाटे आई सौ.सुनीता शिवाजी फाटे व त्यांच्या कुटुंबियांचे विशेष योगदान आहे.

सुयोग फाटे यांच्या या विशेष यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. "सुयोगचे यश हे पंढरपूर परिसरातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्याने आपल्या कष्टाने आणि जिद्दीने संपूर्ण गादेगाव गावासह फाटे कुटुंबाचा मान उंचावला आहे," अशा शब्दांत नागेश फाटे यांनी सुयोगच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुयोगच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.