अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळणार -  डॉ.अनिल काकोडकर

विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उ‌द्घाटन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते संपन्न

अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळणार -  डॉ.अनिल काकोडकर

अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना मिळणार -  डॉ.अनिल काकोडकर

विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उ‌द्घाटन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते संपन्न

पंढरपूर -  ग्रामीण भागाच्या विकासाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात विविध उद्योग सुरु व्हावेत. तसेच तरुणांना विविध व्यवसाय करण्याची संधी मिळावी, तसेच ग्रामीण विकासाच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. यासाठी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा ग्रामीण भागाला होणार असल्याची माहिती ज्येष्ठ शाखज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी दिली.

गोपाळपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उ‌द्घाटन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. प्रशांत पवार, एम. एम. पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आनदार समाधान आवताडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध संशोधनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या आपण अनेक देशांमधून विविध वस्तू आयात करत आहे. यामुळे भारतातील कोट्यावधी रुपये परदेशात जात आहेत. ही रक्कम भारतामध्येच राहावी व भारताचे अर्थकरण वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

यावेळी डॉ. काकोडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे आता ग्रामीण भागापर्यंत तंत्रज्ञान पोहोचणार असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देऊन ग्रामीण भागात अनेक नवीन उद्योजक तयार करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आता उद्योजकांनी ग्रामीण गावे दत्तक घ्यावीत, असे आवाहन डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या त्यानी सेंटरचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील
अनेक तरुणांना होणार असल्याचे सांगितले.