स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी आणि माजी आ.प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी होणार साजरा

पंढरीत सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पांडुरंग परिवाराची बैठक संपन्न

पंढरपूर - प्रतिवर्षीप्रमाणे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पाचव्या पुण्यतिथी तसेच पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पांडुरंग परिवारातील सर्व प्रमुख व युवक कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, लक्ष्मण धनवडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष रोहित पानकर यांच्यासह पांडुरंग परिवारातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड म्हणाले की स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या शिकवणीनुसार पांडुरंग परिवार काम करत आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर आणि परिसरात करण्यात येणार आहे.

यामध्ये महिलांची आरोग्य तपासणी, लहान मुलांची दंत तपासणी, सर्व रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर यासह शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्ठान्न भोजन यासह विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.
या नियोजन बैठकीसाठी पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवारातील सर्व प्रमुख नेते मंडळी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.