सिनेअभिनेते सुदेश बेरी यांनी साठे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या गरबा स्पर्धेचे केले बक्षीस वितरण

सिनेअभिनेते सुदेश बेरी यांनी साठे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या गरबा स्पर्धेचे केले बक्षीस वितरण

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सुदेश बेरी यांची पंढरपूर येथे भेट

सिनेअभिनेते सुदेश बेरी यांनी साठे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या गरबा स्पर्धेचे केले बक्षीस वितरण

पंढरपूर - बॉलीवूडचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सुदेश बेरी हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला व साठे कुटुंबियांनी गरबा नृत्याचे आयोजन टाकळी रोड विठाई सदन येथे केले होते.या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण बेरी यांच्या हस्ते पार पडले. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या वेळी टाकळी भागातील प्रेक्षकांना त्यांनी आपल्या फिल्ममधील डायलॉगच्या माध्यमाने व किसने कितना है दम या गाण्यावरती सर्व रसिकांच्या बरोबर डान्स करून सर्वांना आनंदित केले.यावेळी साठे परिवाराच्या व टाकळीकरांच्या वतीने महेश साठे यांनी आभार व्यक्त केले.

हा कार्यक्रम टाकळी भागामध्ये प्रथमता दांडियाच्या स्पर्धाचे आयोजित करण्यात आला होता.याचबरोबर साठे परिवाराकडून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने टाकळी भागातील नागरिकांसाठी आयोजित केलेले असतात, भागवत कथा, शिवजयंती, गणेश उत्सव असतील देवी असतील संक्रातीच्या माध्यमातून हळदी कुंकू असेल त्याचबरोबर महिला दिन असेल वकृत्व स्पर्धा असतील आरोग्य शिबिर असतील त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचे त्या ठिकाणी कॅम्पस असतील सातत्याने या ठिकाणी या भागांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी व हिताचे कार्यक्रम साठे परिवाराने छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.

या कार्यक्रमाच्या वेळी साठे परिवारांमधील देखील सर्व लोक त्या ठिकाणी आनंद घेताना दिसून आले. त्यामुळे साठे परिवाराची समाजाप्रती आपली बांधिलकी दिसून येते.त्याच बरोबर त्यांची पंढरपुरला येन्याची ही पहिलीच वेळ होती.त्यामुळे पंढरपुरचे विठ्ठल रूक्मणी मातेचे दर्शन घेतल्यावर त्यानी आतीशय समाधान व्यक्त केले.आणी त्यांणी प्रतीक्रीया दिली की विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाचा योग मला माझे मित्र महेश नाना यांचे मुळे आला. त्याबद्दल देखील त्यांनी नानांचे आभार मानले.

यावेळी सरपंच संजय साठे,सदस्य नागरबाई साठे,रेशमा साठे,रोहीणी साठे,दयांनद साठे,जीएसटी निरिक्षक सारीक साठे,शुभम चाफेकर,पवार मॅडम,जाधव वहीणी व भागातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.