खो-खो स्पर्धेत महासिद्ध विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय डोणज संघास विजेतेपद

खो-खो स्पर्धेत महासिद्ध विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय डोणज संघास विजेतेपद

खो-खो स्पर्धेत महासिद्ध विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय डोणज संघास विजेतेपद

मंगळवेढा - (दि.6)रोजी न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील यशवंत मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वय वर्ष मुली व १४ वर्ष मुलांच्या वयोगटांमध्ये महासिद्ध विद्यामंदिर डोणज संघाने सेमी फायनल सामन्यात हुन्नूर संघाचा १ डाव ११ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामना हा महासिद्ध विद्यामंदिर डोणज  विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा या अत्यंत चुरशी सामन्याच्या पहिल्या डावांमध्ये डोणज संघाने मंगळवेढा संघावर १२ गुणांची आघाडी घेतली, यामध्ये डोणजचा  खेळाडू चि. शिरीष पुजारी याने तडफदार ३ मिनिटे ३० सेकंद संरक्षण करीत सिंहाचा मोठा वाटा उचलला, त्याचबरोबर चि. रवी शिंदे,रोहन आनंदपुरे, रंगसिद्ध पुजारी, विकास तेली, प्रतीक सलवदे यांनी महत्त्वाची कामगिरी करत डोणज  संघाने न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा संघाचा १ डाव ७ गुणांनी रोम हर्षक खेळी करत निर्वादपणे वर्चस्व मिळवले.

या सर्व खेळाडूंना ए.एम. स्पोर्ट्स चे सर्व खेळाडू, प्रशिक्षक तथा युटोपीयन शुगर्स चे स्टोअर-अकौटंट सुनील पुजारी व डे.चिफ अकौटंट आमसिद्ध कोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, विजेत्या संघाचे शे.सं.ता.अध्यक्ष-श्रीमंत केदार, रमेश केदार,अनिल लिघाडे, आण्णाप्पा बिराजदार व क्रीडा शिक्षक घोडके सर यांचेसह सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.