माजी आमदार बबनदादा शिंदे यांची नागेश फाटे यांनी घेतली सदिच्छा भेट

माजी आमदार बबनदादा शिंदे यांची नागेश फाटे यांनी घेतली सदिच्छा भेट

माजी आमदार बबनदादा शिंदे यांची नागेश फाटे यांनी घेतली सदिच्छा भेट

पंढरपूर - अमेरिकेत उपचार घेऊन मायभूमीत परतलेले माजी आमदार बबनदादा शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. हनुमंतराव मोरे उपस्थित होते. या भेटीत नागेश फाटे यांनी बबनदादा शिंदे यांच्याशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली.

याप्रसंगी नागेश फाटे यांच्या हस्ते माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फाटे यांनी बबनदादा शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बबनदादा शिंदे यांच्याशी झालेली ही सदिच्छा भेट आत्मीय संवादाची ठरली. पांडुरंगचरणी प्रार्थना करून त्यांना सुख, समाधान व दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना नागेश फाटे यांनी व्यक्त केली.